उचगांव : गांधी चौक येथील रहिवासी, म. ए. समितीच्या कार्यकर्त्या श्रीमती उमाबाई सदबा होनगेकर यांचे बुधवार दि. २३ रोजी निधन झाले. आज सायंकाळी ठीक ४ वा. उचगाव स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष, मराठा को – ऑप बँकेचे संचालक, माजी तालुका पंचायत अध्यक्ष, अडत व्यापारी श्री. लक्ष्मण सदबा होनगेकर यांच्या त्या मातोश्री होत.