कुद्रेमानी : मारुती गल्ली येथील रहिवासी श्रीमती. सुभद्रा अर्जुन पाऊसकर (वय ७६) यांचे आज शनिवार दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे. दुपारी १२ वा. कुद्रेमानी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.