बेळगाव : सोनार गल्ली वडगावच्या येथील रहिवासी श्रीमती शोभाताई आप्पासाहेब मुतगेकर (वय ८८ वर्षे) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी ९ वा. निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघून शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत आप्पासाहेब मुतगेकर यांच्या त्या पत्नी, मराठा समाजातील जेष्ठ स्वर्गीय गुरुअण्णा नाथाजी हलगेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. तसेच प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट एम. डी. चौगुले यांच्या सासूबाई होत.
March 10, 2026
बेळगाव : टिळकवाडी येथील आर्ष विद्या आश्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व पॅटसन मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साध्या आणि […]








