सुळगा (हिं.) : येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा शट्टू चौगुले यांचे आज गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या शुक्रवार दि. २२ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.