किणये / वार्ताहर
बेळगुंदी येथील रहिवासी, उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व ढेकोळकर ट्रेडर्स पेट्रोल पंपचे मालक यल्लाप्पा गावडू ढेकोळकर (वय ५३) यांचे शुक्रवार दि. ३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, तीन मुलगे, सुना, दोन भाऊ असा परिवार आहे. ते बेळगुंदी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष, बेळगुंदी येथील बालवीर अर्बन सोसायटीचे माजी चेअरमन, बालवीर सेवा मंडळाचे सदस्य होते. अंत्यविधी आज शनिवारी सकाळी १०:३० वाजता शिवाजीनगर, बेळगुंदी स्मशानभूमी येथे होणार आहे. ता. पं. माजी सदस्य व ग्रा.पं. विद्यमान उपाध्यक्षा गीता ढेकोळकर यांचे पती व सदस्य कल्लाप्पा ढेकोळकर तसेच मल्लाप्पा ढेकोळकर यांचे ते बंधू होत.