बेळगाव : कामत गल्लीतील रहिवासी व सरपंच श्री. शिवाजीराव गुंडोजी हलगेकर (वय ९१) यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. ते माजी नगरसेवक तसेच महानगरपालिका बेळगाव अग्निशमन विभागाचे निवृत्त अधीक्षक होते. त्यांची अंत्ययात्रा रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. निवासस्थानाहून निघून कामत गल्ली विभाग स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे .