बेळगाव / प्रतिनिधी

शिवाजीनगर, बेंगळूर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी मेट्रो स्थानक असे करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. सदर निर्णयाला कर्नाटकातून तीव्र विरोध होत आहे. शिवाजीनगर स्थानकाचे नाव सेंट मेरी असे न करता छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्थानकडून येत्या सोमवारी जाहीर निवेदन देण्यात येणार आहे.

निवेदन देण्यासाठी सर्व शिवप्रेमी बांधव व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बेळगाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.