बेळगाव : उद्यमबाग येथील प्रसिद्ध उद्योजक व निलजकर साॅ मील आणि धनंजय पॅकर्सचे मालक नारायण यल्लाप्पा निलजकर (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली जावई, नातवंडे परिवार आहे. शांतीनगर टिळकवाडी बेळगाव येथुन त्यांची अंत्ययात्रा निघणार असून आज दुपारी २ वा. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.