येळ्ळूर, ता. २० : सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील जुन्या काळातील गवंडी मेस्त्री श्री. मारुती नागोजी उघाडे (वय ७६ वर्षे) यांचे आज बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , दोन मुली , सुना, जावई , भाऊ, भावजय , पुतणे, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे. येळ्ळूर येथील नेताजी सोसायटीचे संचालक सी. एम. उघाडे यांचे ते वडील होत. अंत्यसंस्कार आज सायंकाळी ७ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (दि. २१) रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.