बेळगाव : कावळेवाडी येथील रहिवासी श्री. मंगाणा पोमाणा कार्वेकर (वय ७०) यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक अविवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मनमिळावू स्वभावामुळे ते गावात सुपरिचित होते. गावच्या सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता. उद्या सकाळी दहा वाजता कावळेवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.