येळ्ळूर : सुभाष गल्ली, येळ्ळूर येथील प्रतिष्ठित नागरिक, आदर्श शिक्षक व सेवानिवृत मुख्याध्यापक श्री. कल्लाप्पा लक्ष्मण हुंदरे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कर्ते मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अंत्यसंस्कार सकाळी ११ . ३० वा. होणार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.