बेळगाव : श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सव सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी असून निमित्त चिदंबर नगर येथील श्री चिदंबर देवस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ९ रोजी सकाळी लघुरुद्राभिषेक आणि श्री मल्हारी होम इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी तीन वाजता गोवावेस येथील श्री राजाराम मंदिर पासून दिंडीयात्रा निघणार असून श्री चिदंबर देवस्थान येथे दिंडीयात्रेची सांगता होणार आहे. सोमवार दि. १० रोजी सकाळी लघुरुद्र, महापूजा आणि ललिता सहस्त्रनाम पठण पूर्वक सामूहिक कुंकुमार्चन होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान जन्मोत्सव,प्रा.संजीव कुलकर्णी यांचे कीर्तन आणि पाळणा होणार आहे. दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक श्री महेश कुलकर्णी आणि श्री उदय देशपांडे यांची संगीत सेवा होणार आहे. मंगळवार दि. ११ रोजी दुपारी श्री रुद्रस्वाहाकार होम, सायंकाळी कार्तिक उत्सव,आरती आणि समारोप होणार आहे.
भक्तांनी मोठ्या संख्येने सगळ्या कार्यक्रमाला तन मन धनाने भाग घेवून श्री कृपेस पात्र व्हावे. ज्या भक्तांना सेवा करायची असेल किंवा देणगी द्यायची असेल त्यांनी मंदिरात संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.







