बेळगाव दि. १६ : “शाॕपिंग उत्सव सारखी प्रदर्शने यश इव्हेंट व कम्युनिकेशन्सनी आयोजित केल्याने बेळगावकरांना नवनव्या वस्तू व उपकरणे एकाच ठिकाणी पहायला व माफक दरात खरेदी करायला मिळतात तसेच स्टॉल धारकांना आपल्या व्यवसायातील विविध उत्पादनांची मांडणी करून ग्राहकां पर्यंत पोहोचता येते” असे मत उद्घाटक रोटरी क्लब बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी मण्णीकेरी यांनी व्यक्त केले.

यश कम्युनिकेशन्स व यश इव्हेंट्सच्यावतीने मिलेनियम गार्डन येथे आयोजित शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन काल स्वातंत्र्यदिनी सायंकाळी अनेक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सुरेखा मुम्मीगट्टी, सविता वेसणे, दीपक वेसणे, सविता हेब्बार, पुष्पा पर्वतराव, आर्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक किर्तीकुमार राजे, एक्सपेडिया सागर वासवानी, आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यास प्रमोद गुंजीकर, विक्रम चौगुले, भाग्यश्री पवार, परशुराम पाटील, दिनेश पाटील, सुशील भातखंडे, क्लासिक फर्निटो पार्कचे ऋषी पाटील, यश किचनचे विठ्ठल बेडका, महालक्ष्मी इंडस्ट्रीजचे राम फडतरे, रणजीत मन्नोळकर, वर्धमान लेंगडे, गुड्डूभाई, आनंद ॲडव्हर्टायझिंगचे अमोल लाड, इन्फो सोल्युशनचे महांतेश पुराणिक, हॉकी बेळगावचे सेक्रेटरी सुधाकर चाळके यांनीही आपली उपस्थिती दर्शवली होती.

यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर विनय कदम यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.गेल्या वीस वर्षांत आपण विविध प्रकारची प्रदर्शने भरवीत आहोत त्याला बेळगावकर उत्तम प्रतिसाद देत आहेत, त्यामुळेच आम्हाला नवीन उमेद मिळत आहे” असे यावेळी बोलताना प्रकाश कालकुंद्रीकर यांनी सांगितले .

हे प्रदर्शन मंगळवार दि. १९ ऑगस्टपर्यंत मिलेनियम गार्डन येथे चालणार आहे.