बेळगाव : मिलेनियम गार्डन येथे यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशन्स यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचा आज, मंगळवार दि. 19 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात बेळगावकरांनी खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला.

या प्रदर्शनात फर्निचर, टूर्स आणि ट्रॅव्हल्स, घरगुती उपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक गाड्या, ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, रेडिमेड कपडे, आभूषणे, घर सजावटीच्या वस्तू, स्वयंपाकघरातील उपकरणे, खेळणी, तसेच विविध प्रकारची खाद्यपदार्थांची स्टॉल्स अशा हजारो वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत्या. ग्राहकांना सवलतीच्या खरेदीची संधी मिळाल्याने स्टॉलवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

नागरिकांनी या उत्सवात विविध वस्तूंची खरेदी करून समाधान व्यक्त केले. “शॉपिंग उत्सवासारखी प्रदर्शने झाल्यामुळे आम्हाला एकाच ठिकाणी नवनवीन वस्तू पाहायला मिळतात व माफक दरात खरेदी करण्याची संधी मिळते” असे अनेकांनी सांगितले.

आयोजकांच्या मते, गेल्या २० वर्षांपासून शॉपिंग उत्सवासारख्या प्रदर्शनांना बेळगावकर नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आले आहेत. या प्रतिसादामुळे आम्हाला नवी उमेद व ऊर्जा मिळत असून पुढेही अशी उपक्रम राबविण्याचा आत्मविश्वास मिळतो, असे यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर नमूद केले.