बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये अग्निशमन विषयक प्रात्यक्षिक उपक्रम नुकताच पार पडला. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना अग्निशमन विषयक परिपूर्ण माहिती देण्यात आली.आग लागली असता कोणत्या दक्षता घ्याव्यात, त्याचप्रमाणे अग्निशमन उपकरणाच्या मदतीने आग कशी विझवावी याबद्दल प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जीएन फायर सेफ्टी कंपनीच्या संचालकांनी यावेळी माहिती दिली. कंपनीच्या वतीने आणि समीर भिष्ती यांनी प्रात्यक्षिक दाखविले. आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर डी. टी. बामणे यांनी यावेळी दक्षता विषयक मार्गदर्शन केले. उपक्रम संयोजनासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. एम. साणिकोप, डॉ. प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.








