बेळगाव : नाथ पै. चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात दि. १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री काळभैरवनाथ जयंती निमित्ताने मंगळवार दिनांक ११  रोजी सायंकाळी चार वाजता होम, बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव , महाआरती, महापूजा , प्रसाद वाटप , सायंकाळी पाच वाजता दीपोत्सव भजन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्या भाविकांना काळभैरवनाथ जयंती निमित्त अभिषेक करायचा असल्यास त्यांनी मंदिराचे पुजारी 9901655450 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंदिराच्या ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.