बेळगाव : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आदर्श जीवन आपल्या साहित्यातून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम महर्षी वाल्मिकी यांनी केले आहे. त्यांचे चरित्र सत्य, प्रेम आणि कर्तव्य पथावर मार्गक्रमण करण्यासाठी सदैव प्रेरणा देते.याच महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मंगळवारी बेळगाव शहरात एकमेव असलेल्या शहापूर बॅ.नाथ पै चौक येथील श्री महर्षी वाल्मिकी मंदिरात भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त अभिषेक, पूजा आरती तसेच बेटगेरी येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाचे अध्यक्षस्थानी वाय पी नाईक यांच्यासह वाल्मिकी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते शिवानंद दुंडगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. वाय पी नाईक आणि शिवानंद दुंडगी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

वाल्मिकी समाज मंदिराचे अध्यक्ष आणि माजी आमदार एम. एल. मुत्तैण्णावर, सेक्रेटरी मारुती नाईक, अशोक नाईक, राजू नाईक, संजीव नाईक बाळेश अष्टगी, हनुमंत शहापूरकर, महादेव शहापूरकर, गणपती शहापूरकर, शाम शहापूरकर, ईराप्पा नाईक, गुंडू नाईक, शटुप्पा नाईक, गुरु शहापूरकर, पी. जी. घाडी , हिरालाल चव्हाण, संतोष होनगल, संजय चौगुले, पुष्पा नाईक, सुधा पाटील, सुमन शिंदे, सुगंधा जाधव यांच्यासह बहुसंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.