बेळगाव / प्रतिनिधी
शहापूर येथील विठ्ठलदेव गल्लीतील शहापूर श्री विठ्ठल मंदिरात, (जुने) येथे दि. २० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आठ दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांना भागवत कथाश्रवणाचा लाभ घेता येणार आहे.
या सप्ताहात कथा-निरुपण श्री हेरंब यशवंत देऊळकर करणार असून, दररोज दुपारी ४ वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल. भागवत धर्म, भक्ती आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देणाऱ्या या प्रवचनमालेस परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
सप्ताहाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








