• पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर जोशीमळा येथे बुधवार (दि. ९) जुलै रोजी विष प्राशन करून तिघांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले.

गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेतील मृत्यूची नोंद मिळाल्यानंतर आरोपी राजेश कुडतरकर, भास्कर सोनारकर आणि नानासो शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

विष प्राशन केलेल्या सुनंदा कुराडेकर हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्याकडून आम्हाला फारशी माहिती मिळालेली नाही.  तिने असेही सांगितले की आमच्या भावाचे ५०० ग्रॅम सोने राजेशच्या घरात आहे. शहापूर पोलिसांनी घरावर छापा टाकला असता ६०० ग्रॅम सोने सापडले. तसेच  ४ लाख रोख रक्कम सापडली. पुढील चौकशी सुरू आहे , असे ते म्हणाले.

जेव्हा जनता कर्ज घेते तेव्हा त्यांनी अधिकृतपणे नोंदणीकृत संघटनांकडून कर्ज घ्यावे असे त्यांनी सांगितले. जर कोणी विनाकारण दुसऱ्याकडून कर्ज घेतले तर ते त्यांना त्रास देतात अशा तक्रारी आल्या आहेत.