• ग्रा. पं. बेनकनहळ्ळी आणि एमएलआरसीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली मोहीम

बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत आणि मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ६ वा. सावगांव धरण परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या धरणामध्ये दरवर्षी सावगांव,बेनकनहळ्ळी गणेशपूर पाईपलाईन, सरस्वतीनगर, अंगडी कॉलेज परिसर, मंडोळी, नानावाडी, हंगरगे, बोकमूर येथील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात विसर्जन करतात. त्यामुळे धरणातील पाणी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. त्या कारणाने पाणी व परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे दरवर्षी ग्रामपंचायत बेनकनहळ्ळी आणि मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर बेळगांवचे १५० हून अधिक जवान या ठिकाणी हजर राहून विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी स्वच्छता राखण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष (सरपंच) डॉ. श्री. यल्लाप्पा म. पाटील, मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कॅप्टन जेनिश के. सब मेजर संदिप खोत, आणि त्यांची टिम, ग्रा. पं. कर्मचारी, आशा वर्कर्स, मठपती कुस्ती आखाड्याचे पैलवान, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी मोठया संख्येने हजर राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने सर्वांच्या चहा,नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.

याप्रसंगी ग्रामपंचायत बेनकनहळ्ळीचे अध्यक्ष डॉ. यल्लाप्पा म. पाटील, मराठा लाइट इनफन्ट्रीचे कॅप्टन जेनीश के. सब, मेजर संदीप खोत, ग्रा. पं. सदस्य कल्लाप्पा पाटील, लिपीक शेखरनेवगी, सागर यत्नट्टी, आशावर्कर कल्पना घाटेगस्ती, सुरेखा कांबळे, मनिषा हिंडलगेकर, शिवानी घाटेगस्ती, निंगाप्पा  पाटील, यशवंत बाणेकर व गावातील नागरिक उपस्थित होते. नारायण काकतकर, ग्रा. पं. सरपंचानी सर्वांचे आभार मानले.