- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार ; ३० सेकंदांत १५ फळे व प्राण्यांची नावे वाचली
- ‘वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून कामगिरीची दखल
बेळगाव : बेळगाव येथील ‘सत् संस्कार इंटरनॅशनल स्कूल’मधील बालवाटिका – १ (नर्सरी) वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षीय कुमार नवतेज भूषण पालकर याने जागतिक विक्रमाची नोंद करत शाळेसह कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
कोणत्याही चित्रांचा आधार न घेता केवळ लिखित मजकूर वाचून ३० सेकंदांत १५ फळे आणि प्राण्यांची नावे वाचण्याची कामगिरी नवतेजने केली. त्याच्या या कामगिरीची ‘वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने अधिकृत दखल घेतली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन (IAS) यांनी नवतेजचा सत्कार करून त्याचे कौतुक केले. सत्संस्कार इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि कर्मचारीवर्गाने नवतेजचे अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








