बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि. २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांची १५१ जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अनंत लाड आणि कार्यवाह सुनिता मोहिते यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यविषयी थोडक्यात आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड, सहकार्यवाह अनंत जांगळे, सदस्य अँड. आय. जी. मुचंडी, अभय याळगी, नेताजी जाधव, सौ. लता पाटील, प्रसन्न हेरेकर, व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर यांच्यासह वाचक व कर्मचारी उपस्थित होते.