चामराजनगर : कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्यात पाच वाघ मृतावस्थेत आढळले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एक मादी वाघिणी आणि तिच्या चार बछड्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूचे कारण विषबाधा असू शकते, तरी अंतिम पुष्टी पोस्टमॉर्टम अहवालानंतरच केली जाईल. चामराजनगर सर्कलचे मुख्य वनसंरक्षक टी. हिरालाल यांनी सांगितले की, वाघिणी आणि तिच्या बछड्यांचे मृतदेह मीनियाम परिसरातील हुग्याम रेंजमध्ये आढळले. ते एमएम हिल्स अभयारण्याचा भाग आहे.