बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर येथील सरस्वती वाचनालयात रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी तबला एकल (सोलो) वादन स्पर्धा भरविण्यात आली आहे. सदर स्पर्धा दिपा तबलावादन, विद्यालय, सरस्वती संगीत विद्यालय, जांबोटी तसेच स्वरानंद संगीत विद्यालय कंग्राळी (खुर्द) बेळगाव या तिन्ही संगीत संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये लहान गट १० ते १८ वर्षापर्यंत तर तर मोठा गट खुला राहील. दोन्ही गटांसाठी पारितोषिके समान आहेत, प्रथम क्रमांक – ३१०१/- , द्वितीय क्रमांक – २१०१/-, तृतीय क्रमांक १५०१/-, चौथा क्रमांक – १२०१/-, पाचवा क्रमांक – १००१/-, सहावा क्रमांक – ५०१/-, सातवा क्रमांक – ३०१/-, आठवा क्रमांक २०१/- सर्व क्रमांकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल.

इच्छुकांनी दि. २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपली नावे ; श्री. शंकर य. मुतगेकर ९७४०९६०८३५, श्री. उत्तम म. सुतार ६३६३१०५६१२, कु. विनायक शं. मुतगेकर ९९६४७८१४१३ यांच्याकडे नोंदवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.