बेळगाव / प्रतिनिधी
टिळकवाडी, बेळगाव येथील संस्कृती एज्युकेअर संस्थेतर्फे ११ वर्षांवरील मुलांसाठी स्वयं-विकास शिबिराचे आयोजन २ एप्रिल २०२६ पासून करण्यात आले आहे. सदर शिबिर पंचवटी प्लाझा देशमुख रोड टिळकवाडी बेळगाव येथे दि. २ एप्रिल ते १६ एप्रिल आणि दि. १ मे ते १५ मे या कालावधीत दोन बॅचेसमध्ये घेतले जाणार आहे.
दररोज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिर घेतले जाईल. शिबिराचे केंद्रित विषय नैतिक मूल्ये, सामाजिक वर्तन, सांघिक कार्य, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, सकारात्मक विचार, भावनांचे व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, सार्वजनिक भाषण, ध्यान, नकार पचवणे, विशेष सहली, खेळ व मनोरंजक उपक्रम, संगीतोपचार अशा विषयांवर असतील.
शिबिराच्या समारोपावर मुलांसाठी विशेष भेटवस्तू तसेच सर्व सहभागींसाठी दुपारचे जेवण दिले जाईल. पालकांनी आपल्या मुलांना या शिबिराचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन मानसशास्त्रज्ञ आणि मार्गदर्शक तेजस कोळेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९१६८३५५५० किंवा ६३६००८४२८६ क्रमांकावर संपर्क साधता येईल.








