बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांना गौरवण्यासाठी संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाते.
यावर्षी हा सन्मान संगीत गुरू शंकर पाटील, नाट्य दिग्दर्शिका सुनिता पाटणेकर आणि समाजसेविका – कवियत्री स्मिता पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार प्रत्यक्षात प्रदान केला जाणार असल्याचे संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले.