बेळगाव / प्रतिनिधी

प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. बेळगाव सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. या भीषण घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. मृत महिलेची ओळख पटली असून, महादेवी करेनवर (वय ४५ रा.वड्डरवाडी,बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. आहे.पोलीस आयुक्त भूषण बोरसे, डीसीपी नारायण बरमणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव बीम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला. या महिलेच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. महादेवी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सदाशिवनगर येथील भाडोत्री घरात तिच्या मुलासोबत राहत होती आणि मुलगा दोन दिवसांपूर्वीच त्याच्या गावी गेला होता अशी माहिती मिळाली आहे. ही घटना एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.