- माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
बेळगाव / प्रतिनिधी
विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी बेळगाव शहरात आरएसएसतर्फे भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन प्रशासनाच्या सहकार्याची विनंती केली.
या भेटीदरम्यान आरएसएसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. पथसंचलनाच्या नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शांतता आणि शिस्त राखत शिस्तबद्ध मार्गाने संचलन पार पाडले जाईल, अशी माहिती बेनके यांनी दिली.