बेळगाव / प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी, मिलेनियम गार्डन, बेळगाव येथे सांस्कृतिक महोत्सव झंकार सीझन २ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी नुकतेच सार्वजनिक बांधकाममंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निमंत्रण देण्यात आले.

रोटरी दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन अ‍ॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन विकास गडवी यांनी संबंधित क्लबच्या वतीने त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले.

झंकार सीझन २ चा उद्देश युवकांची कला प्रतिभा पुढे आणणे, सांस्कृतिक अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणे व मैत्री व सर्जनशीलतेसाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमात युवा कलाकारांच्या कला व संस्कृती प्रतिभेला चालना मिळणार आहे. सतीश जारकीहोळी यांनीही आमंत्रणाचा स्वीकार करून कार्यक्रमाला उपस्थित राहू असे आश्वासन दिले आहे.