बेळगाव : येथील शामा प्रसाद मुखर्जी रस्त्यावरील प्रसिद्ध रॉ फिटनेसच्या वतीने नुकताच मंडोळी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. वनमहोत्सवात रॉ. फिटनेसच्या सुमारे 25 शरीरसौष्ठवपटूनी सहभाग घेतला. यावेळी विविध प्रकारचे शंभरहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. रॉ फिटनेसच्या वतीने गत 5 वर्षांपासून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी रॉ फिटनेसचे संचालक विजय चौगुले, सुनील लाटुकर, सोमनाथ बिर्जे, यश चौगुले, विशाल बिर्जे, संदीप हिरोजी, अथर्व चौगुले, विनीत हणमशेट, मेघन कुगजी, हर्षद पाटील आदी उपस्थित होते.