- बेळगावच्या रोनक गवसला उपविजेतेपद
बेळगाव : हुबळी येथे धारवाड जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना पंचमुखी हनुमान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मि.कर्नाटक बजरंगी शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. कर्नाटक बजरंगी हा किताब पटकाविला. बेळगावच्या रोनक गवसला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. तर बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर ठरला. हुबळी येथील बजरंगी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील जवळपास ११० स्पर्धकांनी भाग घेतला होता.








