बेळगाव / प्रतिनिधी

मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूलचे प्राचार्य डॉ. अरुण मारुती जाधव यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापिठाने डॉक्टरेट (पीएच.डी.) प्रदान केली आहे याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

नवी दिल्ली येथील हॉटेल रेडिसन ब्लू येथे झालेल्या एका प्रतिष्ठित समारंभात, पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापिठ विद्यापीठाने अरुण मारुती जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव आणि गुणवत्ता पूर्ण योगदानाबद्दल डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान केली.

मूळचे बेळगुंदीचे आणि सध्या वैभवनगर येथील रहिवासी राहणारे डॉ. अरुण मारुती जाधव यांनी सध्या जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्य पदावरून संस्थेची धुरा सांभाळली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदू भूषण मिश्रा होते. तसेच या गौरव समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाशीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, प्रमुख वक्त्या म्हणून गाजीपुर येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. श्रद्धा तिवारी,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण संघटना समन्वयक डॉ. विद्याधर पाणिग्रही, प्रख्यात हिंदी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. कृष्णा बोंगाळे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांना पत्नी वंदना जाधव, आई प्रेमा जाधव, भाऊ आनंद जाधव, बी. के. मॉडेल स्कूल प्राचार्य डॉ. सुचेता कुलकर्णी,आधार एज्युकेशन सोसायटी यांचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे, जलाराम ट्रेडिंग कंपनीचे संचालक भूपेंद्रभाई पटेल यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले.