बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ‘प्रगतिशील ‘च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी ही माहिती दिली. खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) येथील श्री. तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विविध चार सत्रात परिसंवाद, विशेष व्याख्यान व कवी संमेलन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आजवरची संमेलने महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, आचार्य अत्रे व साने गुरुजी यांचे विचार व कार्य या मध्यवर्ती संकल्पनेवर झाली आहेत.
March 11, 2026
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान आणि महिलांचा सत्कार बेळगाव / प्रतिनिधी स्त्रीशिक्षण, स्त्रीसमानता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या […]








