बेळगाव : शहापूर येथील विश्व भारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या नव्या वर्गाच्या बांधकामाच्या कॉलम भरणीचा कार्यक्रम आज शुक्रवारी पार पडला पत्रकार श्रीकांत काकटीकर यांच्या हस्ते कॉलम भरणे आणि पूजा करण्यात आली
सदर कामासंदर्भात माहिती देताना, विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी म्हणाले, दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी पदवी पूर्व महाविद्यालयाच्या नव्या वर्गाच्या बांधकामासाठी पाच लाख रुपये निधी मंजूर केला होता. याच निधीतून सदर वर्ग खोलीचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यातील सदर बांधकाम पूर्ण होईल. आगामी काळातही पदवी पुर्व महाविद्यालयाच्या नव्या सभागृहासाठी विविध संघ संस्था,दानी व्यक्ती, लोकप्रतिनिधी तसेच सरकारी स्तरावर निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना श्रीकांत काकतीकर म्हणाले,बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात विश्व भारत सेवा समितीने चालविलेले कार्य कौतुकास्पद आहे. विश्वभारत सेवा समितीच्या शैक्षणिक संस्थांमधून बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याकडे लक्ष देऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य साठी कार्यरत असलेल्या संस्थेला सर्व स्तरातून भरीव मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या एम. एच. पवार, डॉ. स्मिता मुतगेकर, रेणुका चलवेटकर, विजया डिचोळकर लग्मेश खोत, देवकुमार सर, परशराम सांबरेकर व कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मयूर नागेनहट्टी यांनी केले.

 
        
 
            




