बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील टिळकवाडीपहिल्या रेल्वेगेटजवळ साईमंदिर परिसरात गोवा पासिंगची डस्टर गाडी दुभाजकाला आदळून उलटली. गुरुवारी रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडली.
गाडी इतक्या वेगात होती की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळताच ती पलटी झाली. या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. भर पावसात या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.