- वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू
बेळगाव / प्रतिनिधी
घराला आग लागून एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बेळगाव नार्वेकर गल्ली येथे घडली आहे. सुप्रिया बैलूर (वय ७८) असे मृत महिलेचे नाव आहे. सुप्रिया बैलूर घरात एकट्याच राहत होत्या. स्वयंपाक करताना हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरात लागलेली आग बेडपर्यंत पोहोचली आणि नंतर ती इतर खोल्यांमध्ये पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस निरीक्षक श्रीशैल गा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. आगीची तीव्रता इतकी जास्त होती, की घरातील फर्निचर, वस्तू आणि स्वयंपाकघरातील साहित्य जळून खाक झाले आहे.