• गणेशोत्सवापूर्वी खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

गणेशोत्सवापूर्वी खोदलेले रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी करत नगरसेवक शंकर पाटील यांनी बेळगाव येथील एल अँड टी कार्यालयासमोर निदर्शने केली.

बेळगाव शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी एल अँड टी कंपनीने सुरू केलेले खोदकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, तसेच विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू आहे. परिणामी नागरिकांना फिरणे कठीण होत आहे. काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होईल. “अशा परिस्थितीत, रस्ते खोदले, तर सण कसा साजरा करायचा ?” असा सवाल त्यांनी केला. तसेच काम पूर्ण होईपर्यंत येथून हलणार नाही असा आग्रह धरला.