- ओम मंगल कार्यालयात होणार कार्यक्रम
बेनकनहळ्ळी : येथील शिवराज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. परशराम आर. पाटील हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. यानिमित्ताने आज शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वा. ‘ओम मंगल कार्यालय’ सावगांव रोड बेनकनहळ्ळी येथे त्यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा सोहळा होणार आहे.
सदर सोहळा हायस्कुलच्या सभा मंडपात आयोजित करण्यात आला होता. मात्र सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे कार्यक्रम स्थळ बदलण्यात आले आहे. तेव्हा सोहळ्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी ठीक ११ वा. ‘ओम मंगल कार्यालय’ येथे यावे असे आयोजकांनी कळविले आहे.