• औषध प्राशन करून संपविले जीवन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील बिम्स वसतिगृहात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी बंगळुरू येथील रहिवासी असून प्रिया कार्तिक (२७) असे तिचे आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणीचा अभ्यास करणाऱ्या प्रियाने रात्री आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळले आहे.

घटनास्थळी भेट दिलेले बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, बंगळुरू येथील वैद्यकीय विद्यार्थिनी प्रिया कार्तिक मानसिक आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचे कळले. तिने औषध सेवन करून आत्महत्या केली की नाही हे शवविच्छेदनानंतर कळेल. एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.