बेळगाव / प्रतिनिधी
मार्कंडेयनगर येथील एका वसतीगृहामधील मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे ३० मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी मच्छे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही गंभीर अवस्थेतील मुलांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. वस्तीगृहातील भोजनामध्ये पाल पडल्याचे निमित्त झाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांनी मुलांच्या आरोग्यासाठी वसतीगृहाकडे धाव घेतली. त्यांना तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.