• बाळासाहेब देसाई यांचे प्रतिपादन
  • उचगाव येथे रौप्य महोत्सवी मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उत्साहात

उचगाव / वार्ताहर

मराठी भाषा आणि संस्कृती वाढविणे आणि टिकविणे हे सर्वस्वी मराठी माणसांमध्ये आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ती वृद्धिंगत होत असल्याचे मनोगत लँड ट्रिब्युनलचे संचालक बाळासाहेब देसाई यांनी या मुहूर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या रौप्य महोत्सवी उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधीचौक उचगाव येथे हा मुहूर्तमेढ कार्यक्रम माजी मंडळ पंचायत सदस्य बी. एस. होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उचगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष संभाजी कदम आणि माझी सदस्य रामा कदम यांच्या हस्ते मुहूर्तमेढचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक हुक्केरीकर, वामन कदम, शरद जाधव, अमृत पावशे, शरद होनगेकर, ग्रामपंचायत माजी सदस्या उषा होनगेकर, भाग्योदय महिला सोसायटीच्या संचालिका सुनिता होनगेकर ,दिलीप पावशे, अशोक गोंधळी, तरळे यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढचे पूजन सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अकादमीचे सेक्रेटरी श्री. एन. ओ. चौगुले यांनी यावर्षी उचगावचे साहित्य संमेलन हे रौप्य महोत्सवी संमेलन साजरे करत आहोत. पंचवीस वर्षाचा टप्पा या संमेलनाने पूर्ण केला असून आत्तापर्यंत दिग्गज असे साहित्यिक, कथाकार, कवी उचगावच्या या नगरीत येऊन गेले आहेत. आणि पुन्हा आता होणाऱ्या 25 व्या साहित्य संमेलनासाठी उचगाव नगरी सज्ज झाली आहे.आणी संमेलन संदर्भात सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

या मुहूर्तमेढ कार्यक्रमाला उचगाव मधील अनेक मान्यवर मंडळी तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी होणाऱ्या या पंचविसाव्या उचगाव मराठी साहित्य संमेलनचा सोहळा मोठा दिमाख्यात साजरा करूया असे या कार्यक्रम प्रसंगी सर्वांच्या वतीने ठरविण्यात आले.