बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार व मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक, मूळचे राकसकोप येथील व सध्या नागझरीनाथ कॉलनी गोवावेस येथील रहिवासी कै. श्री बाबुराव साताप्पा पाटील वय (वर्षे ७६) यांचे बुधवार दिनांक ९ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुना, एक भाऊ, दोन वहिनी, पुतणे, पुतण्या, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे.

गुरुवार दिनांक १० रोजी मूळचे राकसकोप व सध्या त्यांचे निवासस्थान नागझरी नाथ कॉलनी (डी पी हायस्कूल) गोवावेस येथून निघणार असून सकाळी ठीक १०.३० वाजता शहापूर स्मशान येथे अंत्ययात्रा होणार आहे.शुक्रवार दिनांक ११ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता शहापूर स्मशान येथे रक्षा विसर्जन होणार आहे.