बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मंडोळी गावात काळ्यादिनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत काळ्यादिनाचा उद्देश आणि सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी याबाबत माहिती दिली.
या जनजागृती उपक्रमाला माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह राजू किणेकर, आनंद पाटील बेनकहळ्ळी, नारायण दळवी, बाबासाहेब फगरे, लक्ष्मण नावगेकर, धाकलू पाटील, परशराम शहापूरकर, मोनाप्पा पाटील, पिराजी पाटील, शांताराम कसलकर, बाळू पेडणेकर, राजू कणबरकर, आनंद पाटील, कल्लाप्पा पाटील, राजू ध. कणबरकर, कृष्णा हुंदरे, सोमनाथ दळवी, केदारी कणबरकर, प्रवीण हुंदरे, यल्लाप्पा गेणुचे, नारायण पाटील, महादेव पाटील, मनोहर दळवी, सचिन दळवी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात काळ्यादिनाच्या जनजागृतीसाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू असून, १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.







