सुळगा (हिं.) / वार्ताहर
उचगाव येथील मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीतर्फे देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सुळगा (हिं.) येथील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू श्रेया पोटे हिला संस्थेतर्फे क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय साहित्यभूषण पुरस्कार नाट्यकर्मी व साहित्यिक प्रा. संध्या देशपांडे यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर प्रभाकर सांबरेकर यांना सेवाभूषण, मेहबूब मुल्तानी यांना शिक्षकभूषण, बाळकृष्ण देसाई यांना उचगाव भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण रविवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता शंकर पार्वती मंगल कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जवाहर देसाई यांनी दिली आहे.
कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर व दहावी परीक्षेत उचगाव केंद्रात प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असे कळविण्यात आले आहे.