येळ्ळूर : मूळच्या येळ्ळूर व सध्या रा.नाथ पै. सर्कल शहापूर बेळगाव येथील रहिवासी सौ. शांताबाई परशुराम नंदीहळ्ळी (वय ९०) वर्षे यांचे वार्धक्याने सोमवार (ता. १) रोजी सायंकाळी निधन झाले. गुरुवर्य व माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. उद्या मंगळवार दि. २ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ फ्री बोर्डिंग शहापूर येथून अंत्ययात्रा शहापूर स्मशानभूमीकडे निघणार आहे. गुरुवारी दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.