नवी दिल्ली : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाशी संबंधित खटल्याची सुनावणी लवकर सुरू करण्याची मागणी आज महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात केली. शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील वैद्यनाथन आणि शिवाजीराव जाधव यांनी न्यायालयासमोर ही मागणी सादर केली.
या अर्जावर विचार करताना न्यायमूर्ती संजीवकुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. त्यादिवशी या प्रकरणातील मूळ दाव्याचीच सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, सीमाभागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.








