बेळगाव : छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले, नरगुंदकर भावे चौक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर, शिवसेना रिक्षा स्थानक एसपीएम रोड, कोरे गल्ली शहापूर आदी विविध ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

शतकाहून अधिक वर्षाची वैभवशाली परंपरा असलेली बेळगाव ची शिवजयंती अक्षय त्रितियच्या मुहूर्तावर साजरी होते. या दिवशी अवघी शिवसृष्टी बेळगावच्या गल्लीबोळात, चौका-चौकात अवतरलेली दिसते, शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवा आणि बेळगांव सह सीमावासियांच्या मनात शिवाजी महाराजांप्रति जो आदर,आस्था आहे ते दाखवण्याच माध्यम ही शिवजयंती आहे, शिवरायांच्या शौर्याच, त्यागाच आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून ही शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो. प्रतिवर्षीप्रमाणे ही शिवजयंती आणि चित्ररथ मिरवणूक शांततेत कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता बेळगावकरांनी साजरी करावी असे आवाहन युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले.

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, खजिनदार शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सुरज जाधव, रमेश माळवी, मोतेश बारदेसकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.