- स्मशानभूमीत निवारा शेड उभारण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
शहापूर स्मशानभूमीत गेल्या महिन्याभरापूर्वी कोसळलेल्या निवाऱ्यामुळे आता भर पावसात अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, महापौर मंगेश पवार तसेच शहापूर परिसरातील नगरसेवकांनी शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन तेथील अंत्यविधी व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर या स्मशानभूमीत लवकरात लवकर निवारा उभारण्यात यावा या संदर्भात महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली आहे.
शहापूर स्मशानभूमीतील एका निवाऱ्यावर धाड कोसळल्यामुळे एका निवारातील चार शेगड्यांवर अंत्यविधी होत आहेत. गेले महिने मनापासून संततधार पाऊस सुरू असताना शहापूर स्मशानभूमीत अंत्यविधीचे प्रमाण वाढले आहे. सध्या दिवसाकाठी चार ते सहा अंत्यविधी होत आहेत.वडगाव स्मशानभूमीत लाकडांची कमतरता भासत असल्यामुळे वडगाव परिसरातील नागरिकांना शहापूर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी यावे लागत आहे.अशावेळी एका निवार्या खालील चार शेगड्यांवर अंत्यविधी होत आहेत.त्यामुळे इतरांना अंत्यविधी उघड्यावरील शेगड्यांवर पावसात उरकण्याची वेळ आली आहे.
अंत्यविधीसाठी नागरिकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात दिलेल्या वृत्ताची दखल घेत, महापौर मंगेश पवार, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक गिरीश धोंगडी, महानगरपालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मुत्तैण्णावर आदींनी आज बुधवारी शहापूर स्मशानभूमीला भेट दिली.यावेळी त्यांनी तेथील एका निवाऱ्यात होत असलेल्या अंत्यविधी संदर्भात माहिती घेतली. या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होत असल्याने जुन्या कोसळलेल्या जागी नव्याने निवारा उभारणे आवश्यक असल्याचे दिसून आले. या संदर्भात महापौर मंगेश पवार यांनी मनपा आयुक्तांशी संपर्क साधून लवकरात लवकर या जागेवर निवारा उभारण्यात यावा. अंत्यविधीसाठी नागरिकांना होत असलेले अडचण दूर करण्यात यावी. या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार लवकरच शहापूर स्मशानभूमीत नव्याने निवारा उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती महापौर मंगेश पवार यांनी दिली आहे.