बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सोमवारी आमदार अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना समान न्याय मिळेल अशापद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली.

यामध्ये कर, अर्थसंकल्प व अपील स्थायी  समितीच्या अध्यक्षपदी रेखा मोहन हुगार, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मी महादेव राठोड, शहर योजना व विकास स्थायी समितीच्या अध्यक्षपदी माधवी राघोचे आणि लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नंदू मिरजकर यांची बिनविरोध निवड झाली. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि सत्ताधारी गटनेते नेते हनुमंत कोंगाळी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.