बेळगाव / प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात,या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे आंदोलन केले. कर्नाटक राज्य महापालिका कर्मचारी संघटनेने त्याला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर एक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचे फायदे लागू करावेत आणि राज्य वित्त विभागाकडून अनुदान मंजूर करावे. महानगरपालिका भरती नियमांमध्ये सुधारणा करावी आणि मसुदा अधिसूचना करावी. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना केजी आयडी, जीपीएफचे फायदे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेले आरोग्य लाभ, ज्योती आरोग्य, आरोग्य संजीवनी, राज्य महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
मनपाच्या अधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे विविध संवर्गात पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले असल्याने, विविध पदांवर पदोन्नती देण्यासाठी त्वरित कारवाई करावी. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना केजी आयडी आणि जीपीएफ सुविधा देण्यात याव्यात आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा ज्योती आरोग्य आणि आरोग्य संजीवनी राज्य महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.








